STATE NEWS किती हा घाणेरडा म्हातारा ! पाळीव कुत्रीवर केला अनैसर्गिक बलात्कार

 
dogi
पुणे( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक विकृत आणि किळसवाणा प्रकार समोर आलाय. एका पाळीव कुत्रीला खाण्याचे आमिष दाखवून ६५ वर्षीय म्हाताऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. पाप करीत असताना त्याच्या चोरून काही तरुणांनी त्याचा व्हिडिओ बनवल्यानंतर हा खळबळजनक अन तितकाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळकरवाडी  गावात हा प्रकार समोर आला. भिवसेन धोंडीबा टाकळकर (६५) असे विकृत म्हाताऱ्याचे नाव आहे. वासनेची भूक भागविण्यासाठी म्हाताऱ्याने चक्क स्वतः पाळलेल्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केला. भिवसेन बुढ्याने एक कुत्री पाळली होती. तो तिला खाण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. गल्लीतल्या तरुणांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याच्या पाप कृत्याचा व्हिडिओ बनवला.

 म्हाताऱ्याने हे घाणेरडे चाळे केल्याने सगळेच हैराण झाले. त्यानंतर तरुणांनी एका स्वयंसेवी प्राणीमित्र संस्थेच्या वतीने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कारी भिवसेन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.