STATE NEWS धक्कादायक..!कॉलेजचा बहाणा करून बाहेर फिरायला गेलेल्या तरुण - तरुणीसोबत विपरीत घडल...!
Dec 19, 2022, 16:22 IST
अमरावती( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): कॉलेजच्या बहाण्याने बाहेर फिरायला जाणं तरुण तरुणीच्या अंगलट आलय. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची कार उभ्या वाहनाला धडकली. अपघात एव्हढा भीषण होता की या अपघातात दोघांचाही अक्षरशः चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. अमरावती शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे तरुण आणि तरुणीचे वय केवळ १८ वर्ष एवढे होते.
आदित्य अखीलेंद्र विश्वकर्मा(१८) आणि गौरी शेळके (१८) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार दोघेही कॉलेजच्या बहाण्याने दुसरीकडे फिरत होते. दोघांच्याही कुटुंबीयांना ते कॉलेज मध्ये गेले असल्याचे माहीत होते. दरम्यान एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात आदित्यच्या ताब्यातील कार उभ्या वाहनाला धडकली. अपघात एवढा भीषण होता की या अपघातात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी गाठून मृतदेहांना रुग्णालयात हलविले. तिथे मृतक गौरी शेळकेच्या कुटुंबीयांनी आदित्यच्या कुटुंबियांवर हल्ला चढवला असल्याचा आरोप आहे. याशिवाय आदित्यच्या मृतदेहाला लाथ मारल्याचा आरोपही आदित्यच्या कुटुंबियांकडून केला गेला आहे.