STATE NEWS खळबळजनक! तिला कपडे बदलताना पाहिलं अन् शेजाऱ्याच्या अंगात सैतान घुसला! १५ वर्षीय मुलीची इज्जत लुटली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९ फेब्रुवारी २०२२ ला पीडित मुलीने शिवजयंती निमित्त एका नाटकात भाग घेतला होता. नाटकाचा कार्यक्रम आटोपून ती गुलटेकडी परिसरात असलेल्या घरी येऊन कपडे बदलत असताना शेजारच्या तरुणाची नजर तिच्यावर पडली. मुलगी त्यावेळी घरात एकटीच असल्याचे कळताच आरोपी तरुणाने घरात प्रवेश करत तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संभोग केला. या वेळी त्याने त्या संबंधाचे फोटो देखील काढले. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करीन , जिवे मारीन अशी धमकी देत त्यानंतर अनेकदा शेजाऱ्याने तिच्यावर अत्याचार केला.
हा प्रकार इथेच थांबला नाही. जुलै महिन्यात शेजाऱ्याने त्याच्या मित्राच्या मदतीने पीडित मुलीचे अपहरण करत मुंबईला नेले. तिथे एका खोलीत डांबून ठेवत तो दररोज तिचा उपभोग घेऊ लागला. इकडे पीडितेच्या आईवडिलांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुलीची सुटका केली. त्यानंतर मुलीने सगळा घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता आरोपीला अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील गुलटेकडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.