STATE NEWS खळबळजनक! महाराष्ट्र हादरला..! घटस्फोटीत महिलेवर जंगलात नेऊन अत्याचार! चौघांचे पाप; जो भेटला त्याने साधली संधी! पीडितेची जीवन मृत्यूशी झुंज

 
 नागपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): संताच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना विदर्भातील भंडारा जिल्ह्यात समोर आली आहे. बहिणीशी किरकोळ वाद झाल्याने घरातून बाहेर पडलेल्या ३२ वर्षीय घटस्फोटीत महिलेवर ४ जणांनी आळीपाळीने बलात्कार केला.  ती ज्याला कुणाला मदत मागत होती तो तिच्या जिवावर उठत होता. भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोळ जंगलात तीन रात्री तिच्या शरीराच्या लचके तोडणाऱ्या ठरल्या. या भयंकर अत्याचाराने बेशुद्ध झालेल्या पीडितेला नराधमांनी जंगलात सोडून पळ काढला. अखेर पीडित महिला स्थानिकांच्या दृष्टीस पडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडित महिलेवर सध्या नागपुरातील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

प्राप्त माहितीनुसार पीडित महिला पतीपासून विभक्त राहत असल्याने काही दिवसांपासून ती गोंदिया जिल्ह्यात बहिणीकडे राहत होती. ३० जुलैला बहिणीशी किरकोळ वाद झाल्यानंतर तिने घर सोडले. तिला भंडारा जिल्ह्यात राहणाऱ्या तिच्या आईकडे जायचे होते. ती पायी चालत असताना श्रीराम उरकुडे(४५) तिला भेटला. त्याने त्याच्या कारने तिला माहेरी सोडण्याचे आश्वासन देत तिला कारमध्ये बसवले.
   
  श्रीराम ने रात्री तिला मुंडीपार जंगलात नेले. तिथे एकांतात तिच्याकडे शरीरसुख मागितले. तिने नकार दिल्याने त्याने जबरदस्ती वासनेची भुक भागवली. ती रात्र जंगलात घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी माहेरी सोडण्याचे आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याने संध्याकाळपर्यंत सोबत ठेवले. एका ढाब्यावर जेवण करून कार ३१ जुलैच्या रात्री पुन्हा जंगलाच्या दिशेने वळवली. त्या रात्री सुद्धा रात्रभर त्याने तिची इज्जत लुटली. १ ऑगस्टला पीडित महिलेला कन्हाळमोळ येथील जंगलात सोडून त्याने पळ काढला..!
  
दुसऱ्या - तिसऱ्यानेही साधला डाव..!
  
  दरम्यान १ ऑगस्टला  कन्हाळमोळ रस्त्यावर असलेल्या धर्मा धब्याजवळ पीडिता एकटी बसलेली होती. तिथे एका पंचर काढणाऱ्याला तिने पाणी मागितले आणि घडला प्रकार सांगितला. पंचर काढणाऱ्या युवकाने तिला पाणी  पाजले. तिथे एका दुसऱ्या युवकाने तिला मोटरसायकलवर घरी सोडण्याचे आश्वासन दिले. ती मोटरसायकलवर बसण्यास तयार नव्हती मात्र पंचर काढणाऱ्या युवकाने विश्वास दिल्याने ती मोटरसायकलवर बसली. मोटरसायकलवाल्या तरुणाने तिला जंगलाच्या रस्त्याने नेले. तिथे गाडी थांबवली आणि तिच्यावर तोंड दाबून बलात्कार केला. दरम्यान थोड्याच वेळात "तो" पंचर काढणारा आणि आणखी त्याचा मित्र तिथे पोहचला . तिघांनी त्या महिलेवर पुन्हा रात्रभर बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास तिघे बलात्कारी जंगलातून पळून गेले. 
   
गावातील महिलांनी पीडितेला दिले कपडे..!
 
 दरम्यान तब्बल तीन रात्र तिच्यावर बलात्कार झाल्याने ती बेशुद्ध झाली. जंगलातून जात असलेल्या एका दुचाकीचालकाला दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन रात्री तिच्यावर अत्याचार झाल्याने तिच्या अंगावरील कपडे फाटलेले होते. गावातील महिलांनी तिच्या अंगावर कपडे टाकले. त्यानंतर पीडितेला उपचारासाठी हलविण्यात आले. सध्या नागपुरात तिच्यावर उपचार सुरू असून तिची जीवन मृत्यूशी झुंज सुरू आहे.