STATE NEWS म्हणे तू माझी होणारी पत्नी! गोड गोड बोलून अल्पवयीन मुलीची इज्जत लुटली! गर्भवती राहताच...

 
kraim
हिंगोली( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेषत: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्याचा घटना अलीकडील काळात अधिकच झाल्या आहेत.  हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील मोहगाव येथे सुद्धा नुकताच एक प्रकार समोर आला असून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर मात्र तरुणाने लग्नाला नकार दिला. पिडीत मुलीने पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी २५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोंडीबा सोपान श्रीराम(२५) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने मागील दोन वर्षांपासून गावातीलच एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तू माझी होणारी बायको आहेस, आपण दोघे लग्न करणार आहोत असे गोड गोड बोलून  त्याने तिच्या शरीराचा उपभोग घेतला. दोन वर्षांत अनेकदा त्याने मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.

त्यानंतर मुलीने धोंडीबा ला लग्नाबद्दल विचारणा केली असता त्याने लग्नाला नकार दिला. हे  होणारे बाळ माझे नाहीच अशी भूमिका त्याने घेतली. विश्वासघात झाल्याची खात्री झाल्यानंतर मुलीने घडला प्रकार आईवडिलांना सांगितला. त्यानंतर वसमत पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कारी धोंडीबा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.