STATE NEWS हैवानियत! चहावाल्याच्या ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार! रेल्वे स्टेशनवरच्या खोलीत घेऊन गेला अन्..

 
पुणे( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पुण्यात महाराष्ट्र हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन वर चहा विकणाऱ्या एका चहावाल्याच्या ७ वर्षीय चिमुकलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केलाय. पुणे रेल्वेस्थानक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या वडिलांचे रेल्वे स्टेशन परिसरात चहाचा स्टॉल आहे. मुलगी वडिलांचा डब्बा दुकानावर गेली होती. वडिलांना डब्बा देऊन परत येत असताना एकाने तिला रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म वर असलेल्या खोलीत नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकारानंतर मुलीनं कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका केली.

याप्रकरणी रेल्वे पोलिसांत पॉस्को आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला रूम मध्ये घेऊन जाणारा कोण होता याचा तपास पोलीस करीत आहेत. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात येत असून आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.