STATE NEWS संजय राऊतांचा जेल मधील मुक्काम वाढला! दसरा तुरुंगातच

 
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या जमीन अर्जावर आता पुढील सुनावणी ऑक्टोबरच्या १० तारखेला होणार आहे. त्यामुळे संजय राऊतांना आता दसरा तुरुंगातच साजरा करावा लागण्याची चिन्हे आहेत.

 पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी त्यांना इडीने अटक केली होती. त्यानंतर सातत्याने त्यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. स्पेशल पीएमएलए कोर्टात आज राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने आज राऊत यांची बाजू ऐकून घेतली आता १० ऑक्टोबरला इडी त्यांची बाजू मांडणार आहे. त्यामुळे तुर्तास सध्यातरी संजय राऊत यांना अजून १३ दिवस कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात राऊतांची मोठी भूमिका होती. त्यानंतर सातत्याने भाजपला शिंगावर घेण्याचे साहस ते करीत होते. त्यामुळेच त्यांच्यावर हे दिवस आल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.