STATE NEWS सलूनमध्ये चिघळला वाद! वस्तऱ्याने गिऱ्हाइकाचा गळा कापून खून! संतप्त जमावाने सलूनचालकालाही धाडले देवाघरी
Updated: Sep 16, 2022, 07:59 IST
नांदेड( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): दाढी करण्यासाठी सलून च्या दुकानात गेलेल्या तरुणाचा सलून चालकाशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्या वादात सलूनचालकाने वस्तऱ्याने तरुणाचा गळा कापून खून केला. ही बातमी कळताच तिथे उपस्थित जमावाने सलून चालकाला बेदम मारहाण केली या मारहाणीत सलून चालकाचा देखील मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील बोधडी बु येथे काल, गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.
व्यकंटी सुरेश देवकर(२२) हा तरुण अनिल मारोती शिंदे(३२) याच्या सलूनच्या दुकानात दाढी करण्यासाठी गेला होता. जुन्या विषयावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादात दाढी करीत असताना वस्तऱ्याने अनिल शिंदे याने व्यंकटी देवकर याचा गळा चिरला.आणि अनिल शिंदे फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत गळ्याला रुमाल लावत तरुण दुकानाबाहेर आला आणि जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
गावात ही बातमी पसरताच गावकऱ्यांनी अनिल शिंदे याचा शोध घेतला. तो गावाबाहेर एका झुडपात लपून बसला होता. गावकऱ्यांनी त्यांनी शोधून बेदम चोप दिला. या सामूहिक मारहाणीत अनिल शिंदे याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन असून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. गावात सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.