STATE NEWS धक्कादायक!पोरांनो सावध व्हा; ६५ टक्के पुरुषांना नपुसंकतेचा धोका; बाळ होण्यासाठी येतायेत अनंत अडचणी! वाचा काय आहेत कारणे...

 
prush
नागपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): गेल्या १० वर्षाच्या काळात भारतात अनेक वंध्यत्व निवारण केंद्रे उभारली जात आहे. उपचारानंतर अपत्यप्राप्ती होईल असा दावा या केंद्राकडून केल्या जातो. दरम्यान सध्यस्थितीत ६५ टक्के पुरुषांना नपुसंकतेचा सामना करावा लागत असल्याचे विधान केरळातील त्रिवेंद्रम येथील बायोटेक्नॉलॉजी सेंटर फॉर थारकॉड चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुमार यांनी केले आहे. अभ्यासाअंती धक्कादायक निष्कर्ष समोर आल्याचे ते म्हणाले. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता एका वृत्तपत्राशी त्यांनी संवाद साधतांना याबाबत भाष्य केले.

काही पुरुषांमध्ये शुक्राणू नाहीत. काही पुरुषांमध्ये शुक्राणू आहेत पण ते ऍक्टिव्ह नाहीत. काही पुरुषांत शुक्राणू असले तरी त्यांची संख्या पुरेशा प्रमाणात नाहीत . महिलांच्या बीजाणू सोबत ते संयोग करू शकत नाहीत. काही संयोग करू शकतात मात्र ते प्रजनन क्षम नाहीत असे श्री.प्रदीप कुमार म्हणाले. जगातील ६५ टक्के पुरुषांना नपुसंकतेचा धोका आहे तर १५ टक्के आधीच ग्रस्त आहेत. पुढील १० ते १५ वर्षांत प्रजनन क्षमतेचा दर झपाट्याने कमी होणार असल्याचे ते म्हणाले.

उशिरा लग्न, सध्याशी जीवनशैली, व्यसनाधीनता, ड्रग्ज चे सेवन, एकाच ठिकाणी बसून काम या कारणामुळे शुक्राणूंची क्वालिटी घसरली आहे. काही वर्षापूर्वी ही समस्या एवढी गंभीर नव्हती मात्र आता आपल्या देशात या समस्येने गंभीर रूप धारण केल्याचे डॉ. प्रदीप कुमार म्हणाले.