STATE NEWS ओठावर मिसरुड फुटल नव्हत अन् म्हणे हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला! मामाने पोरगी दिली नाही म्हणून भाच्याने मामाला आयुष्यातून उठवले!कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या .!!
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ ने मामाकडे मुलीसाठी मागणी घातली होती. मात्र तू काहीच काम करीत नाही असे म्हणत मामाने एकनाथ ला मुलगी दिली नाही. त्यामुळे मामाची पोरगी करण्याचे एकनाथचे स्वप्न भंगले. त्यामुळे त्याला त्याच्या मामाचा प्रचंड राग येत होता. मला हुंडा देऊ नका फक्त पोरगी द्या अशी विनंती करूनही मामाने ती मान्य न केल्याने एकनाथ सुडाने पेटला होता.
शुक्रवारी एकनाथचे मामा नांदेड जिल्ह्यातल्या चाभरा गावी घराबाहेर अंगणात झोपलेले होते. रात्री त्यांचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व तपासाला सुरुवात केली. खबऱ्यांनी एकनाथ वर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी एकनाथ ला ताब्यात घेतले. आधी उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या एकनाथ ला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. मामाने पोरगी दिली नाही म्हणून एकनाथ ने मामाचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.