STATE NEWS मशीदीवरचे भोंगे काढा म्हणल तर यांची हातभर फाटली अन् काय तर म्हणे आम्ही बाबरी पाडली!; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल
अयोध्येत बाबरी पाडली तेव्हा मी स्वतः तिथे उपस्थित होते. १८ दिवस जेलमध्ये होतो.त्यावेळी तुम्ही कुठे होते? बाबरी पाडल्याबद्दल ज्या ३२ नेत्यांवर आरोपत्र दाखल झाले त्यात तुमच्या एकाही नेत्याचे नाव नव्हते. या यादीत लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, स्व कल्याणसिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा , महंत नृत्य गोपालदास, रामविलास वेदांती , जयभागसिंग पवैया, आचार्य धर्मेंद्र जी यांची नावे आहेत. या यादीत तुमच्या एकाही नेत्याचे नाव नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.आज राज्यात पत्रकारांवर हल्ले होत आहेत
. सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यासह अन्य नेत्यांवर हल्ले होत आहेत. माध्यमांवर बंधने आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारने आणीबाणीची अवस्था आणून ठेवली आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम माहीत होते मात्र आता सरकारचे वर्क फ्रॉम जेल सुरू आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.