STATE NEWS बाबांनो तिने दाखवलं म्हणून तुम्ही दाखवू नका! महिलेच्या जाळ्यात म्हातारा बघा कसा अडकला! व्हिडिओ कॉलवर तिच्यासमोर कपडे काढून सगळ दाखवलं अन्...!

 
sextottion

मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): इंटरनेट हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग झालाय. इंटरनेट चे जसे फायदे आहेत तसेच अपुरे ज्ञान असल्याचे तोटेही आहेत. अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. व्हिडिओ  कॉल करून कुणीतरी अश्लील चाळे करत आणि समोरच्याला सुद्धा तसे करायला लावत. मात्र त्यानंतर जे घडत ते त्या व्यक्तीसाठी अतिशय धक्कादायक ठरत. घाटकोपरचा एक ६८ वर्षीय म्हातारा व्यावसायिक  अशाच एका प्रकरणात अडकला.

५ सप्टेंबर रोजी म्हाताऱ्या व्यावसायिकाला व्हॉट्सॲपवर एका महिलेचा मॅसेज आला. दोघांचे हाय हॅलो झाले. व्यावसायिकाने स्वतःबद्दलची सगळी माहिती महिलेला सांगितली. त्यानंतर महिलेने व्हिडिओ कॉल केला. मात्र तिने तिचा चेहरा न दाखवता अंगावरील कपडे काढून दाखवले. व्यावसायिकाला सुद्धा तसे करायला लावले.

व्यावसायिकाने तिने सांगितले तसे केले.  त्यानंतर कॉल कट झाला. थोड्या वेळात फेक पोलीस अधिकाऱ्याने फोन करून म्हाताऱ्या व्यावसायिकाला दमदाटी केली. तुमचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ आहे. योग्य रक्कम मिळाली नाही तर अपलोड करतो अशी धमकी दिली. त्याने बँक डिटेल्स व्यावसायिकाला पाठवले  व्यवसायिकाने दोन लाख रुपये आरोपीच्या खात्यात जमा केले. मात्र एव्हढे होऊनही पैशाची मागणी वाढल्याने व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.