STATE NEWS पहिल्या पतीचे निधन झाल्यावर दुसऱ्याशी थाटला संसार! दुसऱ्याशी पटत नसल्याने पुन्हा तिसऱ्याशी जवळीक! तिसऱ्याने केला तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार!
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २८ वर्षीय महिला ही मूळची परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील राहणारी आहे. महिलेला पहिल्या पतीपासून ११ वर्षांची मुलगी आहे. पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर तिने दुसऱ्याशी लग्न केले. दुसऱ्या पतीपासून महिलेला दोन मुले आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वी तिच्यात आणि दुसऱ्या पतीत कुरबुरी सुरू होत्या. दोघांमध्ये आता फारसे पटत नसल्याने तिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आणि ती दुसऱ्या पतीपासून विभक्त राहू लागली. घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात असतांना तिची तिसऱ्याशी जवळीक वाढली.
संशयीत शिवाजी साळवे हा तिच्या आयुष्यातील तिसरा होता. शिवाजी साळवे याच्यासोबत लिव्ह इन् रिलेशशिपमध्ये ती नाशिक येथे राहू लागली. उदरनिर्वाह चालविण्यासाठी ती धुणी भांड्यांचे काम करीत होती. महिला जेव्हा काम करण्यासाठी बाहेर जायची तेव्हा तिचा प्रियकर शिवाजी साळवे हा तिच्या ११ वर्षीय मुलीच्या शरीराचा उपभोग घ्यायचा.
याशिवाय महिलेला दुसऱ्या पतीपासून झालेल्या दोन मुलांसोबत सुद्धा तो अनैसर्गिक कृत्य करायचा. हा प्रकार कुणाला सांगितल्यास त्याने पीडित मुलीला व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान पीडित मुलीला वेदना असह्य झाल्याने तिने तिच्या आईला घडला प्रकार सांगितला. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच घात केल्याचे कळल्यावर महिला हादरून गेली. अखेर हिम्मत करून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलीसांनी शिवाजी साळवे याला अटक केली आहे.