STATE CRIME NEWS खळबळजनक! सासूने फक्त भात केला, पोळ्या केल्या नाही म्हणून सुनेने केला सासूचा खून! नायलॉनच्या दोरीने गळा आवळला..!!
सुषमा अशोक मुळे (७१) असे खून झालेल्या सासूचे नाव असून सुवर्णा सागर मुळे (३२) असे खुनी सुनेचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार सुन दुपारी तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. ती परत आली तेव्हा तिची मुलगी रडत होती. मुलीने आजीने पोळी बनवून दिली नाही फक्त भात खायला दिल्याचे तिने सांगितले. मुलीला दुपारच्या जेवणात फक्त भात दिल्यामुळे सासू सुनेचे जोरदार भांडण झाले.
दोघींनी एकमेकींना खाली पाडले. रागाच्या भरात सुनेने नायलॉनच्या दोरीने सुनेचा गळा आवळला यामुळे सासू बेशुद्ध पडली. संध्याकाळी मुलगा सागर घरी आल्यानंतर त्याला आई बेशुद्ध अवस्थेत दिसल्याने त्याने पत्नीला विचारणा केली. त्यावेळी फिट येऊन सासूबाई बेशुद्ध पडल्याचे तिने नवऱ्याला सांगितले. मुलाने आईला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
असा लावला छडा
सुषमा यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर संशय वाटल्याने डॉक्टरांनी माहिती चाकण पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. मयत महिलेचा मुलगा सागर आणि सुनेची कसून चौकशी केल्यानंतर तिने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर लगेच पोलिसांनी सुनेला गजाआड केले.