संपकरी कर्मचाऱ्यांना ST देणार "धक्का'!; खासगी चालकांच्या नियुक्तीचे नियोजन
Updated: Feb 16, 2022, 09:25 IST
मुंबई ः काही केल्या संपकरी कर्मचारी ऐकत नसल्याने आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याने एसटी महामंडळाने खासगी चालकांच्या नियुक्तीचे नियोजन केले आहे. आजपर्यंत १२२५ खासगी चालक नियुक्त केले असून, राज्यात ९ हजार फेऱ्या सुरू केल्या आहेत. आणखी खासगी चालकांच्या नियुक्त्या वाढवून एसटी सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न महामंडळाने सुरू केले आहे.
२४९ आगार अंशतः सुरू करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून महामंडळाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. जानेवारीत खासगी चालकांच्या नियुक्तीसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हा विषय सध्या न्यायालयात आहे. मात्र तरीही संपकरी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान, २७,९८० कर्मचारी कामावर परतल्याचा दावाही महामंडळाने केला आहे, तर ६४, २९६ कर्मचारी अद्याप संपावरच आहेत.