देवेंद्र फडणवीसांच्या धक्कातंत्रा नंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस! नेटकरी म्हणतात ,सूत्रांच्या मागे कुत्रं लावा,यांना ढेकळ माहीत नसतं..!वाचा व्हायरल होणारे जोक्स..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राज्याच्या राजकारणात आज ३० जूनचा दिवस अतिशय महत्वाचा ठरलाय..महाराष्ट्राचे ३० वें मुख्यमंत्री म्हणून  एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे कालपासूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अन् एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशी दाट शक्यता असताना राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक लगावत एकनाथ संभाजी शिंदे हे मुख्यमंत्री होतील असे जाहीर केले. देशभरातील मिडीयासह खुद्द भाजपच्या अनेक आमदारांना, एकनाथ शिंदे समर्थकांना सुद्धा हा निर्णय बुचकळ्यात पाडणारा होता. विशेष म्हणजे भाजप सत्तेत सहभागी होणार असले तरी मी स्वतः मंत्रीमंडळाच्या बाहेर राहुल सरकारला समर्थन देणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. (अखेरच्या क्षणी केंद्रीय नेतृत्वाच्या विनंती वरून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यासाठी होकार दर्शवला आहे..) दिवसभर वेगळ्या चर्चा सुरू असताना संध्याकाळी घडलेल्या या अनपेक्षित घडामोडीमुळे सोशल मीडियावर विनोदांचा जोरदार पाऊस पडत आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सूत्रांच्या हवाल्याने या या राजकीय  घडामोडींच्या बातम्या गेल्या १० दिवसांपासून देत होत्या. मात्र फडणवीस यांच्या या खेळीची कुणालाही कुणकुण न लागल्याने आता प्रचंड विनोद व्हायरल होत आहे...

 १)सूत्रांच्या मागे कुत्रं लावल पाहिजे कारण सूत्रांना ढेकळ माहीत नसत..! 
२)आज पुन्हा सिद्ध झालं की सूत्रांना घंटा माहीत नसतं..! असे विनोद सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत..
३)शिवसैनिक फुल्ली कन्फ्युज्ड …त्यांना कळत नाहीये की त्यांचे सरकार पडले आहे का आले आहे ?
४)माध्यमांना गेल्या अडीच वर्षांतील दुसरा धक्का..!सूत्र मंडळींना भावपूर्ण श्रद्धांजली
५)काय ती स्ट्राटेजी, काय तो गेम, काय तो धक्का...सगळं वोक्के मध्ये आहे ..!