मसाज पार्लरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय!; बनावट गिऱ्हाईकाने डोक्यांच्या केसातून हात फिरवताच पडला छापा!!; चार महिलांची सुटका
Feb 14, 2022, 13:03 IST
मुंबई ः मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा भंडाफोड मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी केली. एम. जी. रोडवरील बुऱ्हानी हेरिटेजमधील डेस्टीनी स्पामध्ये ही कारवाई ११ फेब्रुवारीला दुपारी करण्यात आली. आतमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री होताच दरवाजात येऊन बनावट गिऱ्हाईकाला केसांतून हात फिरविण्याचा इशारा करायला सांगण्यात आले होते. त्याने केसांतून हात फिरवताना पोलिसांनी छापा मारला. चार महिलांनी सुटका केली. स्पाचा मॅनेजर आणि मालकाला ताब्यात घेतले.
मनिकंठ राहुल नायडू (१९, स्पा सेंटर मॅनेंजर,पाचपीर चौक, काळेवाडी फाटा, पुणे) आणि मालक रंजन विठ्ठल शेट्टी असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. ३१, ३७, ४० आणि ३५ अशा वयाच्या चार महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांना वेश्या व्यवसाय केल्यानंतर मिळणाऱ्या रकमेतून २० टक्के रक्कम दिली जात होती. आठ बाय दहाच्या ४ रूम या स्पा सेंटरमध्ये होत्या. प्रत्येक रूममध्ये एक बेड, त्यावर गादी, उशी, गादीखाली न फोडलेले कामसूत्र कंपनीचे १ कंडोम पाकीट पोलिसांना दिसून आले. पीडित महिलांनी सांगितले, की त्या आधी मसाज करण्याचे काम करत होत्या. मात्र मॅनेजर व मालकाने त्यांना बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.