विकृती... काकूवर तोंड दाबून लैंगिक अत्याचार!
Mar 29, 2022, 10:57 IST
नाशिक : वासनेच्या आहारी गेलेल्या माणसाला नाते संबंधाचे सुद्धा भान उरत नाही. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील शेणवड गावात २८ वर्षीय काकूवर पुतण्याने तोंड दाबून बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संशयित पुतण्या २२ वर्षांचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शेणवड येथील २८ वर्षीय विवाहिता एका लग्नाच्या कार्यक्रमात स्वयंपाकी म्हणून काम करण्यासाठी मांजरगाव येथे गेली होती. तिचा पुतण्या तिला आणण्यासाठी मांजरगावला गेला होता. त्यावेळी त्याने चुलतीला सांगितले की नाना (पीडित महिलेचे पती) दारू पिऊन पडले आहेत.
चल तुला दाखवतो, असे म्हणत त्याने त्याच्या काकूला एका नाल्यात नेऊन मारहाण केली. तिचे तोंड दाबून बलात्कार केला. घडलेली घटना पतीला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अवस्थेत तिने कसेबसे घर गाठून घडला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर घोटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. दरम्यान, पोलीस चौकशीत पुतण्याने बलात्कार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.