मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा ठाकरे सरकारला टोला! म्हणाले, लहान लहान मुलांचा "या" कामासाठी उपयोग करू नका! आधीच्या सरकारनं हिंदू सणांवर बंदी शिवाय केलं काय?

 
मुंबई( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जन्मोत्सवाची धूम आहे. मुंबईतही ठीक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतोय . आज, १९ ऑगस्टला राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील डोंगरी परिसरातील दहीहंडीला भेट दिली. हिंदू सणांवर बंदी शिवाय आधीच्या सरकारने केलं तरी काय असे म्हणत यावेळी लोढा यांनी याआधीच्या ठाकरे सरकारला टोला लगावला. 

 मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील डोंगरी भागात असणाऱ्या बाल सुधार गृहातील बच्चेकंपनी सोबत दहीहंडी उत्सव साजरा केला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना लोढा यांनी याआधीच्या ठाकरे सरकारवर टीका केली. लहान लहान मुलांचा दहीहंडीचे थर लावण्यासाठी वापर करू नका असे आवाहनही यावेळी लोढा यांनी केले. याआधीच्या सरकारने हिंदू सणांवर बंदी घातल्याशिवाय केलं तरी काय असा सवालही त्यांनी केला. आता शिंदे फडणवीस सरकार काय काय करतय यातला फरक बघा असेही लोढा यावेळी म्हणाले.