कामावर सोडतो म्हणून मेव्हणीला गाडीवर बसवले! वाटेतच केला कार्यक्रम! मेव्हणीचा खून करणारा आरोपी गजाआड

 
sayli
सिंधुदुर्ग ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बायकोच्या तरुण मैत्रिणीचा एकाने खून केल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे मृतक तरुणी ही आरोपीला जीजू नावाने हाक मारायची तर आरोपी त्या तरुणीला स्वतःची मेव्हणी म्हणजेच बायकोची बहीण समजत होता. सायली गावडे(२२) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून गोविंद दाजी जाधव (२८, रा परुळे, ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग) असे पोलिसांनी ताब्यात  घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील सायली चा मृतदेह आडेली व वेतोली हद्दीतील एका बागेत सापडला. तिच्या मानेवर व डोक्याच्या मागे जखमा असल्याने पोलिसांना खुनाचा संशय होता. वेंगुर्ला पोलिसांनी संशयित म्हणून तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीनंतर त्यातील एकाने खून केल्याची कबुली दिली.


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद दाजी जाधव यांची बायको व सायली एकमेकांच्या मैत्रिणी होत्या. सायली गोविंद ला जिजू म्हणत होती. सायली एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. सायली नेहमी एसटी बसने कामाच्या ठिकाणी जायची. शनिवारी गोविंद तिला रस्त्यात भेटला. तुला बाईकवर कामाला सोडतो असे म्हणत त्याने तिला बाईक वर बसवले. मात्र त्या दिवशी सायली कामावर पोहचली नाही...वाटेतच दोघांमध्ये काय झाले कुणास ठाऊक मात्र त्यानंतर गोविंद ने सायली चा खून  केला. सायली चा खून का केला असावा याचा कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.