मूळव्याध कायमचा बरा करतो म्हणे! औषध देण्याच्या बहाण्याने १८ वर्षांच्या तरुणावर दोघांचा अनैसर्गिक बलात्कार! चिखलीतील खळबळजनक घटना ..!!

 
mulvyad
चिखली(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): आजाराचा उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषध देणाऱ्याकडे गेलेल्या तरुणावर दोघांनी सामूहिक अनैसर्गिक बलात्कार केला. या प्रकारामुळे तरुणाच्या विशिष्ट अंगाला गंभीर जखमा झाल्या. पुण्यातील चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही खळबळजनक घटना समोर आली आहे. 

प्राप्त माहितीनुसार तरुणाला काही दिवसांपासून मूळव्याधीचा आजार होता. दवाखान्यात उपचार करूनही फरक पडत नसल्याने त्याने त्यावर आयुर्वेदिक उपचार करायचे ठरवले. रस्त्याच्या कडेला तंबू टाकून जडी बुटी विकत देण्याचा दावा करणाऱ्याकडे तो गेला. औषध देण्याचा दावा करणाऱ्या २५ आणि २३ वर्षीय तरुणाने तुझा मूळव्याध कायमचा बंद करतो असा शब्द दिला. 
   
पीडित तरुणाला आरोपींनी तंबूत बोलवले. तपासणी करण्यासाठी त्याला अंगावरील कपडे काढायला सांगितले. आणि त्यानंतर दोघांनी त्याच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.. हादरवून सोडणाऱ्या या घटनेने पीडित तरुणाला प्रचंड रक्तस्त्राव झाला. कशाबशा अवस्थेत तो रुग्णालयात पोहचला . उपचार केल्यानंतर त्याने पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. बलात्कार करणारे दोघेही तंबू घेऊन पसार झाले आहेत.