लग्न जुळायला अडचणी येताहेत? गणपती बाप्पाचे हे सोपे उपाय करा...
प्रचंड मेहनत करूनही एखाद्या स्पर्धेत किंवा परीक्षेत यश नसेल तर ज्योतिषशास्त्रानुसार भगवान गणेश आपली मदत करू शकतात. प्रामाणिकपणे बाप्पाचे नामस्मरण करा. याशिवाय बाप्पाच्या मंदिरात जाऊन कच्चा धाग्याला सात गाठी माराव्यात. जय गणेश काटो क्लेश किंवा गणपती बाप्पा विघ्न दूर करा, अशी प्रार्थना बाप्पास्मोर करावी व तो धागा बाप्पासमोर ठेवावा. असे केल्याने विघ्न दूर करून यश प्राप्ती होते, अशी मान्यता आहे.
मुलाचे लग्न जुळत नसेल, त्यात अडचणी येत असतील तर बाप्पाच्या मंदिरात जाऊन २१ दुर्वा आणि गूळ अर्पण करावा. मुलीच्या विवाहात अडचणी येत असेल तर बुधवारी गणपती बाप्पाला मोदकांचा व खव्याचा नैवैद्य दाखवावा. आर्थिक अडचण दूर करण्यासाठी विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे स्मरण करा. बुधवारी सकाळी गणपती मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा तसेच गुळाचा नवैद्य दाखवून गायीला खाऊ घालावे. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, अशी मान्यता आहे. स्मरणशक्ती कमी असेल किंवा एखादी गोष्ट पटकन आठवत नसेल तर रोज सकाळी अथर्वशीर्ष वाचन करावे.