Good News झालं रे बॉ पेट्रोल डिझेल स्वस्त..! फडणवीस म्हणाले, आता राज्याने राज्याचं काम करावं..
पेट्रोल व डिझेलवर अनुक्रमे ८ व ६ रुपये प्रतीलीटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारला यासाठी प्रतिवर्ष १ लाख कोटी इतका भार सहन करावा लागणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना प्रती सिलेंडर २०० रुपये सबसिडी देण्याचा निर्णय सुद्धा केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारला ६ हजार १०० कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारला सवाल केला आहे. केंद्र सरकारने त्यांचे काम केले आहे. आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन पेट्रोल व डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा . कारण महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलचे दर अधिक सर्वाधिक आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते तर जनतेला दिलासा द्यायचा असतो असेही फडणवीस म्हणाले..