GOOD NEWS पेट्रोलचे भाव १२ रुपयांनी कमी होण्याची शक्यता! पहा आजचे भाव

 
petrol
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): गेल्या तीन महिन्यांपासून देशात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.  आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खनिज तेलाच्या किमतीत घट सुरू आहे. गेल्या तीन महिन्यात खनिज तेल २५ ते ३० डॉलरने स्वस्त झाले. मात्र असे असले तरी या भाव घसरण्याचा फायदा मात्र अजून भारतीयांना झाला नाही. २१ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कमी केला होता. त्यानंतर पेट्रोलच्या दरात साडेनऊ रुपये तर डिझेलच्या दरात ७ रुपयांनी घट झाली होती. अद्याप त्या दरात फारसा बदल झालेला नाही. दरम्यान आता मात्र हे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाची घसरण होत असली तरी आज देशात सर्वत्र पेट्रोल डिझेल च्या भाव स्थिर आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील घटीच्या तुलनेत दरात कपात करण्याचा विचार तेल कंपन्या करीत आहेत. असे झाले तर पेट्रोल आणि डिझेल ११ ते १२ रुपयांनी स्वस्त होऊ शकते.दिल्लीत आज पेट्रोल ९६.७२ रुपये ,डिझेल ८९.६२ रुपयांवर स्थिर आहेत. तर महाराष्ट्रात पेट्रोल १०६.३१ तर डिझेलचे दर ९४.३५ रुपये इतके आहेत.