GOOD NEWS! पोलीस भरतीचा अर्ज दाखल करण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा; सर्व्हर डाऊन होत असल्याने अर्ज भरण्यासाठी येत होत्या अडचणी..!
Updated: Nov 29, 2022, 17:12 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्य सरकारच्या पोलिस भरती प्रकियेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आता १५ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज,२९ नोव्हेंबरला याबाबतचा निर्णय जाहीर केला. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली. आता १५ डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.
याआधी ३० नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सेंटर वर विद्यार्थी करीत होते.मात्र सर्व्हर सातत्याने हँग होत असल्याने रात्र-रात्र जागून उमेदवारांना अर्ज भरावा लागत होता. अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने काही विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता होता. त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी होत होती. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवून देत असल्याची घोषणा केली.
राज्य सरकारने पोलिस शिपाई १४ हजार ९५६ जागा, पोलिस चालक २१७४ जागा व राज्य राखीव दल १२०१ जागा या तीन विभागांमध्ये भरती प्रकिया सुरू केली आहे. यातील बुलडाणा जिल्ह्यात ५१ पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. आता १५ डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.