प्रेमाच्या नावाखाली हॉटेलमध्ये बोलावून भावी डॉक्टर तरुणीवर लैंगिक अत्याचार
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जानेवारी २०२१ ते १६ फेब्रुवारी२०२२ या कालावधीत संशयिताने तरुणीवर अत्याचार केला. पीडित तरुणीशी ओळख झाल्यानंतर त्याने तिला फोन करून प्रपोज केले. तू मला खूप आवडतेस. मी तुला भेटायला कोल्हापूरला येतो, असे तो तिला म्हणायला. कोल्हापूरला गेल्यानंतर त्याने तिला कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकाजळ बोलावले. त्यानंतर त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.
त्या प्रसंगाचे मोबाइलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले. तिच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेत तिला रात्रभर हॉटेल मध्ये राहण्यास बाध्य केले. या घटनेनंतर धक्का बसलेल्या पिडीत तरुणीने त्याच्याशी बोलणे टाळले त्यामुळे त्याने तिच्या अंगावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली.. मोबाईल मध्ये शूट केलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला..अखेर हे सर्व सहन करण्याच्या मर्यादेपलीकडे गेल्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी आरोपी कांबळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.