व्हिडिओ कॉल करून तिला नग्न व्हायला सांगितले... नंतर मागितली खंडणी
सय्यद सोहेल सय्यद गफ्फार (रा. धार रोड, परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील महिलेला सय्यदने व्हिडिओ कॉल केला. तो तिने उचलला. नंतर तो वारंवार व्हिडिओ कॉल करू लागला.
एकदा त्याने तिला व्हिडिओ कॉलवर नग्न व्हायला सांगितले. तिने तसे केले. बदनामीच्या भीतीपोटी ती त्याचे म्हणणे ऐकत होती, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. याचा गैरफायदा घेत त्याने व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट काढले. ते तिला पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.तरुणाच्या ब्लॅकमेलिंगला महिला वैतागली होती. तो तिच्याकडे वारंवार पैसेसुद्धा मागत होता.
मात्र महिलेने त्याची शरीरसुखाची आणि पैशांची मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने तिचे फोटो आणि मोबाइलवर झालेले कॉल रेकॉर्डिंग महिलेच्या नातेवाइकांना पाठवले. बदनामी होत असल्याने तिने औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सय्यदला या कामात त्याचे आणखी काही साथीदार मदत करत असावेत, असा संशय पोलिसांना आहे.