रात्री १० हजार रुपयांत बोलावले अन् तिघांनी केला सामूहिक बलात्कार!; पोलिसांनी आधी वाटले पीडित तरुणी, नंतर लक्षात आले ही तर...
पीडित तरुणी एस्कॉर्ट आहे. तिला जोबराज यादव नावाच्या व्यक्तीने १० हजार रुपये एका रात्रीसाठी कबूल करत घरी बोलावले. मीरा रोडवरून ती प्रत्यक्षात त्याच्या मालाड येथील फ्लॅटवर गेली तेव्हा तिथे तिला तीन पुरुष आढळले. तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. जोबराजने तिला १० हजार रुपये दिल्यानंतर तिने आणखी पैसे मागितले.
मात्र तिघांनी तिला पैसे देण्याऐवजी हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. तिने मालाड पोलिसांना कॉल करून बोलावून घेतले. निर्भया पथकाच्या अधिकारी तिथे जाईपर्यंत सुनील गिरी आणि सुनील साहू हे फरारी झाले. जोबराजला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिघांविरुद्ध पोलिसंनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांना तरुणी एस्काॅर्ट सेवेसाठी काम करत असल्याचे आढळले.
मुंबईत सर्रास एस्कॉर्ट सेवा...
मुंबईत एस्काॅर्ट सेवेचे पेव फुटल्याचे या घटनेतून समोर आले आहे. वेश्या व्यवसायाचा हा आधुनिक अवतार असून, ऑनलाइन नोंदणी करून अशा पद्धतीने तरुणीला घरी किंवा इच्छित स्थळी बोलावले जाते. हा प्रकार गैरकायदेशीर असूनही सारे काही गुपचूप चालत असल्याने ना सेवा देणारे हाती लागतात ना गिऱ्हाईक. पोलिसांनी आता अशा एस्काॅर्ट सेवा देणाऱ्या आणि घेणाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडण्याची गरज आहे. बुलडाणा लाइव्हने राज्यातील कोणकोणत्या शहरात अशा प्रकारच्या सेवा दिल्या जातात, याबद्दल संबंधित संकेतस्थळावरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक अशा शहरांची यादीच समोर आली. सुदैव आपल्या बुलडाण्याचे नाव त्यात नाही.