Breaking मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची धोक्यात?! राज्यातील सर्व काँग्रेस आमदारांना आजच्या आज दिल्लीत हजर राहण्याचे आदेश
१० दिवसांआधी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत पाचव्या उमेदवाराला विजयी करण्यासाठीचे संख्याबळ जवळ नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बेरजेच्या राजकारणामुळे त्यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली.
स्वतःचे १०६ आणि अपक्ष , छोटे पक्ष मिळून ११३ आमदार सोबत असताना भाजपने तब्बल १३४ मते मिळविली. त्यामुळे महाविकास आघाडीचे तब्बल २० आमदार फुटलेत. स्वतःची ४४ मते असताना काँग्रेसला पहिल्या पसंतीची केवळ ४१ मते मिळाली त्यामुळे काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. सरकारचे नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा आमदारांशी संवाद नसल्यानेच हा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.
"सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे झाली आहेत, आता सरकार म्हणून काहीतरी विचार केला पाहिजे." असे विधान काल, निकालानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ राजकीय विश्लेषकांकडून लावण्यात येत आहे. त्यातच सर्व काँगेस आमदारांना दिल्लीला हजर राहण्याचे आदेश दिल्याने तिथे पक्ष नेतृत्वाकडून काँग्रेस आमदारांची व नेत्यांची चांगलीच कानउघाडणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेतून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा आदेश महाराष्ट्र काँग्रेसला अखिल भारतीय काँग्रेसकडून मिळण्याची शक्यता आहे.