बाप्पा... हरबऱ्यांची इतकी कमाल... तुम्ही वाचा ही बातमी उद्यापासून "हरबरे'च ठेवाल लक्षात!
Feb 5, 2022, 11:39 IST
गरीब असो वा श्रीमंत हरभरे कुणाच्याही घरी सहज उपलब्ध होतात. हरभऱ्यात अ, ब, क, ड आणि के हे जीवनसत्वे असतात. याशिवाय क्लोरोफिल, मॅग्नेशियम, फॉस्फरस सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. गावरान हरभरे रात्री भिजत घालून सकाळी त्याचे सेवन केल्यास अनेक आजरांपासून तुम्ही दूर राहू शकता. गावरान हरभरे हे तुमच्या शरीरातील साखर नियंत्रित ठेवतात. त्यामुळे डायबीटीजच्या रुग्णांना सकाळी रिकाम्यापोटी भिजवलेले हरभरे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
प्रथिने आणि फायभर हरभऱ्यात मुबलक प्रमाणात असते. याशिवाय त्यात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे सकाळी रिकाम्यापोटी हरभरे खाल्ल्यास पोट भरलेले राहते. तुम्हाला भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रियादेखील सुधारते. ज्या लोकांना बाधकोष्टता व पोटाचे विकार आहेत, त्यांनी भिजवलेले हरभरे खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो.
गावरान हरभरे खाल्ल्याने डोळ्यांशी संबंधित समस्या कमी होतात. तुमची दृष्टी वाढते. त्यामुळे चांगल्या डोळ्यांसाठी डॉक्टरदेखील भिजवलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. शरीरात जर रक्ताची कमतरता असेल किंवा अशक्तपणा असेल तर रोज सकाळी भिजवलेले हरभरे खावे. त्यात लोह अधिक प्रमाणात असते. त्यामुळे अशक्तपणा व थकवा दूर होण्यास मदत होते.