State news हनुमान जयंतीनिम्मित भाजपचे मोहित कंबोज मंदिरांना वाटणार १ हजार लाऊडस्पीकर! म्हणाले, जनाब उद्धव ठाकरे गप्प का?

 
78365
मुंबई : हनुमान जयंतीनिम्मित भाजपचे मोहित कंबोज आज देशभरातील मंदिरांना १ हजार  लाऊडस्पीकरचे वितरण करणार आहेत. याआधीच त्यांनी तशी घोषणा केली होती. आणखी जे अर्ज येतील त्याची खात्री करून त्या मंदिरांना सुद्धा लाऊडस्पीकर देणार असल्याचे मोहित कंबोज यांनी काल,  मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 मस्जिद पेक्षा जास्त लाऊडस्पीकर मदरशांवर लावले आहेत. हे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवत हे भोंगे लावले असल्याचे मोहित कंबोज म्हणाले. या भोंग्याच्या आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी आम्ही हे सगळ करीत आहोत. मीरा रोड भागातील एका काँग्रेस नेत्याने स्वतःच्या भागातील मस्जिदवरील भोग्यांचा आवाज कमी केला आहे,याचे आम्ही स्वागत करतो असेही कंबोज म्हणाले.

 आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य असून प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावत  मशिदीवर एक एक किलोमीटर अंतरावरती लावलेल्या भोंग्यावर आमचा आक्षेप असल्याचे ते म्हणाले.  या सगळ्या मुद्यांवर जनाब उद्धव ठाकरे गप्प का? शिवसेना गप्प का?  असा सवालही कंबोज यांनी केला आहे. १९९५ ला हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी महाआरतीची घोषणा केली होती मात्र सत्तेच्या लाचारीसाठी तुम्ही महाआरतीच्या विरोधात जाणार का असा सवाल कंबोज यांनी केला आहे. हा मुद्दा आमच्यासाठी राजकीय नसून सामाजिक व धार्मिक मुद्दा असल्याचे मोहित कंबोज म्हणाले.