भरधाव आयशरच्या धडकेत जिल्हा परिषद शाळेतील लिपीकाचा जागेवरच मृत्यू! नांदुरा नजीकची घटना
Updated: May 30, 2024, 10:36 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मलकापूर कडून खामगावच्या दिशेने जात असलेल्या भरधाव आयशरच्या धडकेत जिल्हा परिषद शाळेतील लिपीकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल २९ मेच्या दुपारी नांदुरा बायपास येथे घडली.
प्रदीप दत्तात्रय कुळकर्णी (५२ वर्ष) असे मृतकाचे नाव असून ते सुटाळा खुर्द, खामगाव भागातील रहिवासी होते. कुळकर्णी हे पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषदेतील शाळेवर लिपिक म्हणून कार्यरत होते. २९ मे रोजी शाळेत आपल्या कर्तव्यावर जाण्यासाठी ते दुचाकीने निघाले होते. दरम्यान, दुपारी १२ वाजेच्या सुमारास नांदुरा बायपास वरील पेट्रोल पंपानजीक भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली. यात प्रदीप कुळकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार विलास पाटील यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी, घटनास्थळ गाठले आणि पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आयशर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.