गल्ली गल्लीत चुकीचं काम ! अमडापुर पोलिसांनी रंगेहाथ पकडलं.

 
अमडापुर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अमडापुर शहरात वरली मटका व्यवसायिकांचा सुळसुळाट असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. मंगळवारी एकाच भागातील विविध अड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. त्यामध्ये वरली मटका व्यवसायिकांवर अमडापूर पोलीस ठाण्यात २३ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. 
शहरातील लाखनवाडा रोड परिसरात विविध ठिकाणी नजरेआड वरली मटका वाल्यांचे दुकाने थाटले आहे. मंगळवारी शहर पोलिसांनी त्या भागातील ५ दुकानात छापा टाकून काही मुद्देमाल जप्त केला. वरली मटक्यांच्या दुकानात दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत असली तरी, पोलिसांच्या हाती लागलेला मुद्देमाल अत्यंत कमी आहे. दिड हजारांचा आत हा मुद्देमाल मिळाला. चिट्या, पेन, आणि काही रुपये मिळून आले आहेत. पाच ठिकाणच्या छाप्यात गजानन बारबळ , संदीप महानकर, अमोल गायकवाड, गजानन गवई यांच्या विरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.