खामगाव ते चांगेफळ रस्त्याचे काम रखडले, ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना घातले साकडे!
Dec 20, 2021, 21:16 IST
जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव ते चांगेफळ रस्त्याचे काम एक ते दीड वर्षापासून रखडलेले आहे. या रस्त्याला ३० ते ३५ खेडे लागू आहेत. त्यांना खामगावला जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. या रस्त्याने वाहनधारकांना मोठी कसरत करून वाहन चालवावे लागते. छोटे- छोटे अपघात घडतात. कधी कामाला सुरुवात होते कधी बंद पडते... चालू झाले तर संथ गतीने काम चालू होते... त्यामुळे वाहनधारक वैतागले आहेत.
खासदार प्रतापराव जाधव व खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी या कामाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. बांधकाम विभाग व कंत्राटदाराला गतीने, दर्जेदार काम करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी द्याव्यात, अशी मागणी जलंब येथील सरपंच सौ. मंगला उत्तम घोपे, माटरगाव येथील सरपंच सौ. राधा प्रशांत टिकार व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.