वन्य प्राण्यांचा जयरामगड परिसरात धुमाकूळ; शेतकरी त्रस्त!

 

खामगाव(भागवत राऊत:बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन्य प्राणी धुमाकूळ घालत असल्याने शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याची घटना खामगाव तालुक्यातील जयरामगड परिसरातून समोर आली आहे. 

Add
                  Add. 👆
वनविभाग कार्यालय अंतर्गत शिर्ला नेमाने बीट परिसरातील जयरामगड परिसरात काही दिवसापासून वन्यप्राणी धुमाकूळ घालत असल्याने शेतातील ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान होत आहे. निल गाय, रोही, रानडुक्कर,हरीण, अश्या वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मात्र याकडे खामगाव वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी रात्री शेतात जागरण करतात. आधीच शेतकरी अस्मानी संकटांमुळे हवालदिल झाला आहे. आणि त्यातच वन्य प्राण्यांमुळे शेतकरी वैतागुन गेला आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जयराम गड परिसरातील शेतकऱ्यांकडून कऱण्यात येत आहे.