विठुरायाच्या दर्शनासाठी जायचेय? खामगाव वरून सुटणार विठ्ठल दर्शन एक्सप्रेस; कधी आणि भाडे किती? वाचा....

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आषाढी एकादशी साठी खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सुटणार आहे. दोन फेऱ्यांमध्ये ही गाडी भाविकांना घेऊन पंढरीत जाणार असून तिथून पुन्हा खामगावात घेऊन येणार आहे.  पहिलं फेरी २६ जून तर दुसरी फेरी २९ जूनला सकाळी ११ वाजता सुटणार आहे.
 

दरवर्षी जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सोडण्यात येते. कोरोना आधी ४ फेऱ्या सोडण्यात येत होत्या, मात्र आता त्यात कपात करण्यात आली असून २ फेऱ्या सोडण्यात येणार आहे. यंदा २० बोगींची ही एक्सप्रेस असणार आहे. त्यात जनरल बोगी १, आरक्षित बोगी ६, एसी २ टायर १ बोगी, एसी ३ टायर १ बोगी, गार्डसाठी २ बोगी यात प्रवाशी व दिव्यांगांना बसण्याची सुविधा राहणार आहे. एकूण १५०० भाविकांना घेऊन ही विठ्ठल दर्शन एक्सप्रेस जाणार आहे. तर पंढरीतून २७ व ३० जूनला पहाटे ५ वाजता परतीच्या फेऱ्या सुटणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता या फेऱ्या खामगावात पोहचतील.

असे असेल भाडे..!

विठ्ठल दर्शन एक्सप्रेस विशेष गाडी असल्यामुळे त्यात भाडे सवलत देण्यात आलेली नाही. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक यांना इतर गाड्यांमध्ये रेल्वे प्रशासनाकडून सवलत देण्यात येते मात्र विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाडीत कोणतीही सवलत नसल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. या गाडीत जनरल बोगीत २२५ रुपये, आरक्षित तिकीट करिता ४८५ रुपये, एसी टू टायर मध्ये १८७५ तर एसी थ्री टायर मध्ये १३१५ रुपये इतके भाडे असणार आहे.