वाजवा रेऽऽ... ६३ मुहूर्त!; २० नोव्हेंबरपासून लग्नाचा धडाका!!
असे आहेत मुहूर्त...
नोव्हेंबर : २०, २१, २९, ३०
डिसेंबर : १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९
२०२२
जानेवारी : २०, २२, २३, २७, २९
फेब्रुवारी : ५, ६, ७, १०, १७, १९
मार्च : २५, २६, २७, २८
एप्रिल : १५, १७, १९, २१, २४, २५
मे : ४, १०,१३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७
जून : १, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२
जुलै : ३, ५, ६, ७, ८, ९
लॉन्स, मंगल कार्यालयांकडे विचारपूस सुरू
जिल्ह्यात आता कोरोनाचे सावट जवळपास दूर झाल्यात जमा आहे. गेल्या दोन दिवसांत तर एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. त्यामुळे प्रशासनानेही नियम शिथील केले आहेत. मंगल कार्यालयात यंदा लग्न लागू शकत असल्याने इच्छुकांकडून विचारपूस होऊ लागली आहे. ऐनवेळी मंगल कार्यालय, लॉन्स मिळत नाही. त्यामुळे आधीच बुकिंग करून ठेवण्याकडे कल असतो. डिसेंबर, एप्रिल आणि मेमधील बुकिंग करण्याकडे सर्वाधिक कल असतो. केटरर्स, डेकोरेशनची सध्या बुकिंग कुणी करत नाहीत. पण नागरिक विचारपूस करून जात असल्याचे सांगण्यात आले. यंदा कार्यालय, लॉन क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी मिळावी आणि नियम व अटीमध्ये सूट मिळावी, अशी मागणी मंगल कार्यालय आणि लॉन्स मालकांकडून होत आहे.