शेगाव, खामगावमध्ये अवकाळीने झोडपले; झाडे गाड्यांवर कोसळली, टिनपत्रे उडाली! सगळीकडे हाहाकार..
Apr 23, 2024, 17:20 IST
खामागाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आज दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे खामगाव, शेगाव शहरांमध्ये हाहाकार उडाला आहे. गारपीट आणि वादळीवार्याच्या ठिकठिकाणी झाडे कोसळली, उभी झाडे वाहनांवर कोसळल्याचे ही चित्र आहे. अनेकांच्या घरावरील छप्पर सुद्धा उडाले असल्याने सर्वसामान्यांचे अवकाळीमुळे अतोनात नुकसान झाले आहे.
Advt.👆
सद्या स्थानिक एमएसईबी चौकामध्ये असलेल्या शेगांव- खामगांव रस्त्यावर झाड पडल्याने शेगांव खामगांव रस्त्यावरील वाहतुक बराच वेळ खोळंबली होती. अवकाळी पावसामुळे लखपती गल्ली परिसरात राहत असलेले संदेश डांगरा यांच्या घरावरील पाण्याची टाकी हवेमुळे कोलमडली. त्या ठिकाणी कुठलीही जिवीत हानी झालेली नाही.सिध्दीविनायक कॉम्पलेक्स मध्ये असलेल्या जिन्यावरील टिनपत्रे सुध्दा या अवकाळी पावसात उडून गेले.
आदर्श नगर परीसरात विजेचे दोन लोखंडी पोल वाकल्याने तिन्ही तार तुटुन अस्ताव्यस्त पडली. बी.जी. परघरमोर यांचे घरासमोरील झाड पडले, राजेश ओईंबे यांच्या अंगनातील आंब्याचे झाड पडले. तर राजरत्न परघरमोर यांचे घरासमोरील अंगणातील निंबाचे मोठे झाड बुडासहीत उन्मळून पडले.तसेच शेगाव विश्रामगृह येथे पोलीस प्रशासनाची सुमो गाडी ही उभी असता त्या गाडीवर अख्खे झाडच पडले. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोलमडली असल्याने थोड्या वेळात आलेल्या पावसाने सर्व अस्ताव्यस्त झाल्याने काही काळाकरीता जनजिवन विस्कळीत झाले होते.