रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू! शेगाव तालुक्यातील घटना

 
bul
जलंब( बुलडाणा लाइव्ह बवृत्त्सेवा):  रेल्वेतून पडून एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असल्याची घटना १४ मार्च रोजी जलंब - नांदुरा लोहमार्गावर लांजुळ शिवारात घडली. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत वृत्त असे की जलंब ते नांदुरा रेल मार्गावर किमी ५३०/१६ मध्ये लांजुळ शिवारात डाऊन लाईनवर रेल्वेतून पडून एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे अशी फिर्याद रटेशन प्रबंधक वाघ जलंब यांच्यामार्फत शैलेश कुमार शिवलाल ठाकूर ट्रॅकमन यांनी जलंब पोस्टेला दिली. यावरून पोलिसांनी मर्ग नंबर ०५/ १७४ जाफो अन्वे दाखल केला आहे. पुढील तपास बीट जमदार दिनकर तिडके हे करीत आहेत.