दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या! दोघे जागीच ठार; रस्त्यावर रक्ताचा चिखल! खामगाव - बुलडाणा रस्त्यावर झाला अपघात

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन मोटारसायकली समोरासमोर धडकून दोघे जागीच ठार झाले. खामगाव - बुलडाणा रस्त्यावरील शिरसगाव देशमुख फाट्याजवळ काल, ५ नोव्हेंबरच्या रात्री पावणेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. 
सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किशोर कवठेकर (३८)हे या अपघातात जागीच ठार झाले तर ठार झालेल्या दुसऱ्या मोटारसायकलस्वाराचे नाव राजेश चव्हाण (३२, रा. गेरू माटरगाव) असे आहे. दोघांच्या मोटारसायकलींची शिरसगाव देशमुख गावाजवळ समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्ताचा अक्षरशः चिखल पडला होता, दोन्ही मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले. रुग्णवाहिकेने दोघा जखमींना सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले,मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.