वरून एकामागून एक दोन हेलिकॉप्टर गेले! वखरणी करणाऱ्या बैलजोडीचे बुजाडल्याने पाय मोडले! जलंबच्या शेतकऱ्याचे नुकसान! शेतकऱ्याची बैलजोडी दिडलाखाची! आज सकाळची घटना

 
Hdhhx
जलंब(संतोष देठे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. शेतात वखरणी सुरू असताना एकामागून एक काही फूट अंतरावरून दोन हेलिकॉप्टर गेले. यामुळे बैलजोडी बुजाडली. अर्धा किलोमीटर वखरासह उधळली. यामुळे एका बैलाच्या पायाला वखराची पास लागल्याने पाय मोडला.
डोलारखेड येथील शेतकरी पुरुषोत्तम येडुजी देठे आज सकाळी त्यांच्या बैलजोडीने शेतात वखरणी करत होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यावरून एकामागे एक असे दोन हेलिकॉप्टर गेले. हेलिकॉप्टर अगदी कमी उंचीवरून उडत होते असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
  हेलिकॉप्टर कुणाचे होते, त्यात कोण होते,कुठे गेले याबद्दल माहिती नाही. दरम्यान हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे त्यांची बैलजोडी बुजाडली. वखारासह अर्धा किलोमीटर उधळली. यात त्यांच्या एका बैलजोडीला वखराची पास लागली, त्यामुळे बैलाचा पाय मोडला आहे. ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्याच्या बैलाचा पाय मोडल्याने मोठे नुकसान झाले आहे. बैलजोडीची किंमत दीड लाख रुपयांची आहे. संबधित विभागाने पंचनामा करून शेतकऱ्याला मदत देण्याची मागणी होत आहे.