खामगाव तालुक्यातील दोन तरुणी गायब! एक संडासला गेली होती दुसरी कुणालाच न सांगता केली निघून

 
Missing
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खामगाव तालुक्यात दोन तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. एक संडासला जाते म्हणून घराबाहेर पडली मात्र ती अजूनही परतली नाही.तर दुसरी १९ वर्षीय तरुणी कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली.
झाले असे की कु अंजली प्रमोद सुरवाडे (१८, रा.बोरी अडगाव) ही ८ मे रोजी संध्याकाळी संडासला जाते असे म्हणून घराबाहेर पडली होती. त्यानंतर बराच वेळ झाला तरी ती घरी परत आलीच नाही.त्यामुळे घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला तरिही तिचा शोध न लागल्याने अखेर बेपत्ता अंजली सुरवाडे ची आई सौ उज्वला प्रमोद सुरवाडे (३६) यांनी तशी तक्रार खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. पोलिसांनी सौ. सुरवाडे यांच्या तक्रारीवरून हरवल्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत चिंचपूर येथील कु मोहिनी निलेश चव्हाण (१९) ही ६ मे रोजी रात्री ११ ते ७ वाजेच्या दरम्यान घरात कोणालाही काही न सांगता निघून गेली आहे. याप्रकरणी बेपत्ता तरुणीचे वडील निलेश मदनलाल चव्हाण (४५) यांनी तशी तक्रार ८ मे रोजी हिवरखेड पोलीस स्टटेशनमध्ये दिली आहे. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.