पुण्याला जायला आजोबासोबत ट्रॅव्हल्समध्ये बसली, ट्रॅव्हल्स अमडापुरात हॉटेलवर थांबली! आजोबांना म्हणे लघवीला जाते अन् पुढे जे घडलं ते धक्कादायक..

मोताळा तालुक्यातील तरोडा गावची आहे १६ वर्षीय मुलगी! आजोबा म्हणे नातीचे किडनॅपिंगचा झाले..
 
Bdhcn
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अमडापुर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या हॉटेल यश येथून अनोळखी व्यक्तीने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मुलगी आजोबासोबत पुण्याला जात होती, ट्रॅव्हल प्रवाशांच्या जेवणाकरीता हॉटेल वर थांबली. त्यावेळी मी लघवीला जाते असे सांगून अल्पवयीन मुलगी बाजूला गेली..मात्र त्यानंतर ती पुन्हा आली नाही..४ डिसेंबरच्या रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अमडापुर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dhanik
               जाहिरात👆
 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी मोताळा तालुक्यातील तरोडा गावची आहे. ती शेगाव तालुक्यातील गायगाव येथे मामाच्या गावाला गेलेली होती. ४ डिसेंबरच्या रात्री साडेसात वाजता ती आजोबासोबत स्वामी ट्रॅव्हल ने कामानिमित्त पुण्यात राहणाऱ्या मामाकडे जायला निघाली. रात्री सव्वादहाला बस जेवणासाठी उदयनगर ते अमडापुर दरम्यान असलेल्या हॉटेल यश वर थांबली.
   
 यावेळी आजोबा आणि नात गाडीच्या खाली उतरले. मी लघवी करण्यासाठी जाते असे सांगून मुलगी बाजूला हॉटेल यश जवळ असलेल्या बाथरूम कडे गेली. मात्र १५ - २० मिनिटे होऊनही ती परत आली नाही. आजूबाजूला शोधाशोध करुनही ती सापडली नाही. ती कुठे गेली , कशी गेली याबाबत माहिती नसल्याचे आजोबांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले असून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या नातीचे किडनॅपिंग केले असावे असा संशय आजोबांना आहे..