शेगावमध्ये वाळूमाफियांची खैर नाही... त्‍यांचा बंदोबस्त असा होणार!

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्‍यात वाळूमाफिया शिरजाेर झाले असून, सर्रास अवैध वाळूउपसा सुरू आहे. संबंधित अधिकारीही अर्थपूर्ण कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी वाढल्याने आता वाळूमाफियांचा बंदोबस्त करण्यासाठी पथक स्‍थापन करण्यात आले आहे.
शेगाव तालुक्यातील पुर्णा, मन, बोर्डी या नदीपात्रातील वाळू घाटांचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केलेले आहेत. तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रणासाठी शेगाव तहसीलदारांनी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे अधिनस्थ 24 तासांसाठी फिरते व बैठे पथक स्थापन केलेले आहे. तसेच वाळूघाट असलेल्या प्रत्येक गावासाठी गावचे सरपंच, सचिव, तलाठी, कोतवाल यांचे अधिनस्थ ग्रामदक्षता समिती नियुक्त करून त्यांना अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्याबाबत निर्देशीत केले आहे, असे तहसीलदार, शेगाव यांनी कळविले आहे. त्‍यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.