मोताळ्यात उद्या आठवडी बाजार भरणार नाही! वाचा काय आहे कारण...
Jun 28, 2023, 14:43 IST
मोताळा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येथील आठवडी बाजार २९ जून रोजी आहे. परंतु, त्या दिवशी आषाढी एकादशी व बकरी ईद सण असल्यामुळे आठवडी बाजार ३० जून रोजी भरणार आहे..
मोताळा येथे दर गुरुवारी मोठा आठवडी बाजार भरतो. बाजारामध्ये ५० ते ६० गावातील लोक येतात. तसेच नांदुरा, मलकापूर, बुलढाणा यासह आदी शहरातील व्यावसायीक आपले दुकाने थाटतात. या आठवड्यात २९ जून रोजी आठवडी बाजार आला आहे.
त्याच दिवशी हिंदू बांधवांची आषाढी एकादशी व मुस्लीम बांधवांची बकरी ईद आल्याने गुरुवारचा आठवडी बाजार ३० जून रोजी भरणार आहे, याची नागरिक आठवडी बाजारामध्ये दुकाने व भाजीपाला विक्री करणाऱ्यांनी नोंद, असे आवाहन मोताळा नगर पंचायत प्रभारी मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.