शेतकऱ्याच्या स्वप्नाला आग लागली! शॉर्ट सर्किट झाले, अडीच एकरातील मका पिकाचा कोळसा!मोताळा तालुक्यातील येथील घटना

 
hc

मोताळा (संजय गरुडे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):-  कोथळी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे अडीच एकरातील मक्याचे पीक जळून खाक झाले आहे.

कोथळी शेतकरी विनायक संतोष सातव यांनी आपल्या शेतात अडीच एकरावर उन्हाळी मका पिकाची लागवड केली होती. मका सोंगुन ठेवलेला असताना शेतात गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये शॉर्ट झाल्याने शेतातील मक्यामध्ये आग लागली व यामध्ये अडीच एकरावरील पूर्ण मका पीक जळून खाक झाले आहे.विनायक संतोष सातव या शेतकऱ्याचे कोथळी शिवारामध्ये गट नंबर ३२३ मध्ये शेती आहे. या शेतामध्ये त्यांनी उन्हाळी मकाची अडीच एकर क्षेत्रावर लागवड केलेली होती. काढणीला आलेला मका पिकाची सोंगणी त्यांनी मागील आठवड्यात केली होती . सुकण्यासाठी ठेवलेल्या या मक्याला  काल रात्री झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली व यामध्ये शेतामध्ये पसरलेला अडीच एकरामधील सर्व मका जळून खाक झाला .यामध्ये मका पिकासाठी अंतर्गत ठिबक व पाईप सुद्धा जळून खाक झाले याबाबत शेतकऱ्याने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी महावितरण कडून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे.