खामगावच्या जनुना तलावात पाण्यावर तरंगत होता मृतदेह;खिशातील एटीएम, पॅन कार्ड वरून ओळख पटली!
Jun 30, 2023, 10:43 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खामगाव शहरापासून जवळच असलेल्या जनुना तलावात तरंगत असलेल्या मृतदेहाची एटीएम, पॅन कार्ड वरन ओळख पटली.
खामगाव शहारापासून काही अंतरावर जनुना तलाव आहे.या तलावात काल आषाढीच्या दिवशी २९ जून रोजी स्थानिकांना एक मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला दिसला. स्थानिक नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पाण्याच्या बाहेर काढुन त्याचे खिशे तपासले. मृत व्यक्तीच्या खिशातून एटीएम कार्ड, पॅन कार्ड मिळाले पॅन कार्ड वरील नाव श्रीकृष्ण वासुदेव बावस्कार (रा. तरोडा डी, ता - शेगाव) आहे. पोलिसांनी चौकशी करून हा मृतदेह श्रीकृष्ण बावस्कार याचाच असल्याचे निष्पन्न झाले. पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.