BREAKING नांदूऱ्यातील सेतू केंद्र संचालकाला लालच नडली! पाचशे रुपयांसाठी गेला आत..

 
फजम
Advt
Add
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) नांदुरा तहसील अंतर्गत येत असलेल्या ई सेवा व सेतू केंद्र संचालकला पाचशे रुपयांची लालच चांगलीच नडली. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी एकाला ५०० रुपये जास्तीची रक्कम सांगत लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. यावरून सेतू केंद्र संचालका विरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रशांत कोठे असे लाच मागणाऱ्या सेतु संचालकाचे नाव असून त्याने ३०० रुपयांची तडजोड देखील केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपधीक्षक श्रीमती घोगरे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली. प्रशांत कोठे याच्या विरोधात आज २९ जून रोजी नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.