Amazon Ad

संशयी नवरा! बायकोच्या चारित्र्यावर नेहमी घ्यायचा संशय; केले मोठे कांड! खामगावची घटना..

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) संसार म्हटल म्हणजे दावे प्रति दावे, वादविवाद होतोच. पण किरकोळ कारणावरून होत असलेले वाद जास्त काळ चालत नाही असे म्हणतात. घरातले पती-पत्नीचे सकाळचे भांडण संपून संध्याकाळी एकाच ताटात जेवन करतानाचे प्रसंग कित्येकांनी अनुभवले आहेत. परंतु चारित्र्यावर संशय घेतल्यावर होणारा वाद टोकाला जातो. याची असंख्य अशी उदाहरणे आहेत. तशीच एक धक्कादायक घटना खामगावातून समोर आली आहे. पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन झालेल्या वादात पतीने चक्क तिच्या डोक्यात कुकर मारले. मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही दिली. २५ जून रोजी ही घटना उघडकीस आली. 
    प्राप्त माहितीनुसार, ३० वर्षीय विवाहितेने याबाबत शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. रुपाली शिवाजी बाभुळकर ह्या पतीसोबत राहतात. दरम्यान, रविवारी पत्नी स्वयंपाक करत असताना दोघांमध्ये थोडे बिनसले. पती शिवाजी याने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस मारहाण केली. एवढेच नाही तर हा वाद इतका टोकाला गेला की, संतापलेल्या शिवाजीने पत्नीच्या डोक्यात कुकरच मारले. यात तिच्या डोक्याला दुखापत झाली असून मार लागला आहे. पती शिवाजी बाभुळकर याने चरित्रावर संशय घेऊन मारहाण केली, वाद घातला असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.