अवघ्या १५ वर्षाचा सुपेश घरून निघून गेला ,तीन दिवस उलटले तरी परतलाच नाही!

 
जळगाव जामोद (संतोष देठे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जळगाव जामोद तालुक्यातील कुरणगाळ येथील रहिवासी सुपेश रामेश्वर आटोळे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. अवघ्या १७ वर्षाचा सुपेश १४ मे रोजी दुपारी घरातून निघाला होता. आता तीन दिवस उलटून गेले तरी परत आला नाही. घरचे शोधून शोधून थकले, अखेर त्यांनी जळगाव जामोद पोलिसांत माहिती दिली.
 अंगात निळ्या रंगाचा शर्ट, काळा रंगाची पॅन्ट  
चेहरा गोरा अशा वर्णनाची माहिती पोलिसांना देण्यात आली. १४ मेच्या दुपारी २ वाजता सुपेश रामेश्वर आठोळे हा तरुण निघून गेला आहे. कुणाला आढळल्यास जळगाव जामोद पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. किंवा 9011945445, 9527014264, 9021379320 या क्रमांकावर संपर्क करावा असे नातेवाईकांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये सर्वाधिक तरुणांची संख्या जास्त असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.